Bank: KYC साठी बँकेच्या लाईनमध्ये थांबण्याची गरज संपली; आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करा बँक केवायसी

Bank: KYC साठी बँकेच्या लाईनमध्ये थांबण्याची गरज संपली; आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करा बँक केवायसी

KYC माहिती अपडेट करण्यासाठी देखील बँकेत जाण्याची गरज नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) ग्राहकांसाठी नवी सोय उपलब्ध करून दिली आहे.

कोणत्याही कामासाठी बँकेच्या शाखेत जाणं तासभर रांगेत थांबणं आता जूणं झालं आहे. कारण आता बहुतांश प्रक्रिया ऑनलाईन झाल्या आहेत. आता KYC माहिती अपडेट करण्यासाठी देखील बँकेत जाण्याची गरज नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) ग्राहकांसाठी नवी सोय उपलब्ध करून दिली आहे. ज्यांची KYC कागदपत्रे वैध आहेत आणि पत्त्यामध्ये कोणताही बदल नाही अशे ग्राहक आता ऑनलाईन पद्धतीने KYC अपडेट करू शकतात.

आधी KYC अपडेट करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाणे आवश्यक होते. पण आता RBI ने या प्रक्रियेला सोपे बनवले आहे. ज्या ग्राहकांनी आधीच KYC साठी वैध कागदपत्रे जमा केली आहेत आणि ज्यांचे पत्ते बदललेले नाहीत अश्या ग्राहकांसाठी आता ऑनलाईन KYC अपडेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ऑनलाईन KYC अपडेट कसं करायचं?

  • तुमच्या बँकेच्या ऑनलाईन बँकिंग पोर्टलवर लॉग इन करा.
  • KYC’ टॅब शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि तुमची माहिती जसे नाव, पत्ता, जन्मदिनांक इत्यादी भरा.
  • आधार, पॅन आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा. दोन्ही बाजूंची स्कॅन केलेली प्रत करा याची खात्री करा.
    ‘Submit’ बटणवर क्लिक करा. तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर मिळेल आणि बँक तुम्हाला SMS किंवा ईमेल (जो लागू असेल) द्वारे प्रगतीबद्दल माहिती देत राहील.

काही प्रकरणांमध्ये KYC अपडेटसाठी बँक शाखेत जाणे आवश्यक असू शकते. असे बहुधा तुमची KYC कागदपत्रे एक्सपायर झाली असल्यास किंवा अजून वैध नसल्यास होते. बँकेची शाखा येथे जाताना तुम्हाला Officially Valid Documents (OVD) यादीमध्ये दिलेल्या कागदपत्रांची प्रत घेऊन जावी लागेल.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *