Olympics 2024 India Schedule

Olympics 2024 India Schedule

Olympics 2024 India Schedule:भारताचा ११३ जणांचा चमू Paris गाजवणार; वेळापत्रक जे माहित असायलाच हवं
Paris 2024 Olympics India schedule: निरज चोप्रा, पी व्ही सिंधू यांच्यासह अनेक खेळाडूंवर भारतीयांची नजर असणार आहे.
२०२०च्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघ सर्वात मोठा १२४ खेळाडूंचा चमू घेऊन मैदानावर उतरला होता. चार वर्षांपूर्वी भारतीय खेळाडूंनी एकाच ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक ७ पदकं जिंकली होती. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकनंतर ( ६) ही पदकांची सर्वाधिक आकडेवारी होती आणि यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ११३ भारतीय खेळाडू टोक्योचा पदकाचा विक्रम मोडतील, अशी आशा आहे. निरज चोप्रा, पी व्ही सिंधू यांच्यासह अनेक खेळाडूंवर भारतीयांची नजर असणार आहे. पण, हे भारतीय कधी, केव्हा व कुठे खेळतील हेही जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला २६ जुलैपासून सुरुवात होत आहे. पण, २४ जुलैपासून रग्बी व फुटबॉलच्या साखळी फेरीतील सामन्यांना सुरुवात होणारर आहे. भारताचा ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवास २५ जुलैपासून सुरू होईल आणि तिरंदाज मोहीमेची सुरुवात करतील. २७ तारखेला भारत पदकाचे खाते उघडू शकतो. १० मीटर एअर रायफल स्पर्धेत संदीप सिंग, अर्जुन बबूत, एलावेनिल व्हालारिव्ह आणि रमिता हे पदकासाठी प्रयत्न करतील. स्पर्धेचा शेवटचा पदक इव्हेंट हा महिलांच्या ७६ किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेतून होऊ शकतो. यात रितिका हूडा हिला पदकाची प्रबळ दावेदार मानले जात आहे.

हॉकी – भारत वि. न्यूझीलंड
बॅडमिंटन – पुरुष व महिला एकेरी साखळी फेरी, पुरुष व महिला दुहेरी साखळी फेरी
बॉक्सिंग – प्राथमिक फेरी ( राऊंड ऑफ ३२)
रोईंग – पुरुष एकल स्कल हिट्स
नेमबाजी – १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता फेरी, १० मीटर एअर रायफल पदक सामना, १० मीटर एअर पिस्तुल पात्रता फेरी
टेबल टेनिस – पुरुष व महिला एकेरी राऊंड ऑफ ६४
टेनिस – पुरुष व महिला एकेरी आणि दुहेरी प्रथम फेरी
२८ जुलै, रविवार
तिरंदाजी – महिला सांघिक फेरी राऊंड ऑफ १६ ते फायनल
रोईंग – पुरुष एकल स्कल्स रिपेचेज फेरी
नेमबाजी – १० मी. एअर रायफल महिला पात्रता, १० मी. एअर पिस्तुल पुरुषांची अंतिम फेरी, १० मी. एअर रायफल पुरुषांची पात्रता, १० मी. एअर पिस्तूल महिला अंतिम
जलतरण – पुरुषांची १०० मी. बॅकस्ट्रोक हीट्स, पुरुषांची १०० मी. बॅकस्ट्रोक उपांत्य फेरी, महिलांची २०० मी. फ्रीस्टाइल हीट्स, महिलांची २०० मी. फ्रीस्टाइल उपांत्य फेरी
२९ जुलै, सोमवार
तिरंदाजी – पुरुष सांघिक राऊंड ऑफ १६ ते फायनल
हॉकी – भारत विरुद्ध अर्जेंटिना (दुपारी ४:१५)
रोईंग – पुरुष एकल स्कल्स उपांत्य फेरी
नेमबाजी – ट्रॅप पुरुष पात्रता, १० मी. एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रता, १० मी. एअर रायफल महिला अंतिम, १० मी. एअर रायफल पुरुष अंतिम
जलतरण – पुरुषांची १०० मी. बॅकस्ट्रोक अंतिम, महिलांची २०० मी. फ्रीस्टाइल अंतिम
टेबल टेनिस – पुरुष आणि महिला एकेरी राऊंड ऑफ ६४ व राऊंड ऑफ ३२

टेनिस – दुसऱ्या फेरीचे सामने
३० जुलै, मंगळवार
तिरंदाजी – महिला वैयक्तिक राऊंड ऑफ ६४ व राऊंड ऑफ ३२, पुरुष वैयक्तिक राऊंड ऑफ ६४ व राऊंड ऑफ ३२
घोडेस्वार – ड्रेसेज वैयक्तिक दिवस १
हॉकी – भारत विरुद्ध आयर्लंड ( दुपारी ४:४५)
रोईंग – पुरुष एकल स्कल्स उपांत्यपूर्व फेरी
नेमबाजी – ट्रॅप महिला पात्रता – पहिला दिवस, १० मी. एअर पिस्तूल मिश्र सांघिक पदक सामने, ट्रॅप पुरुषांची अंतिम फेरी
टेनिस – तिसऱ्या फेरीचे सामने
३१ जुलै, बुधवार

बॉक्सिंग – उपांत्यपूर्व फेरी
घोडेस्वार – ड्रेसेज वैयक्तिक दिवस २
रोईंग – पुरुष एकल स्कल्स उपांत्य फेरी
नेमबाजी – ५० मी. रायफल थ्री पोझिशन पुरुष पात्रता, ट्रॅप महिला अंतिम
टेबल टेनिस – राऊंड ऑफ १६
टेनिस – पुरुष दुहेरी उपांत्य फेरी
१ ऑगस्ट, गुरुवार
ऍथलेटिक्स – पुरुषांची २० किमी चालण्याची स्पर्धा, महिला २० किमी चालण्याची स्पर्धा ( सकाळी ११ नंतर)
बॅडमिंटन – पुरुष आणि महिला दुहेरी उपांत्यपूर्व फेरी, पुरुष आणि महिला एकेरी उपउपांत्यपूर्व फेरी

हॉकी- भारत विरुद्ध बेल्जियम ( दुपारी १.३० वा. )
गोल्फ – पुरुष फेरी १
ज्युडो – महिलांची ७८+ किग्रॅ राऊंड ऑफ ३२ ते फायनल
रोईंग – पुरुष एकल स्कल्स उपांत्य फेरी
नौकानयन – पुरुष आणि महिला Dinghy शर्यत १-१०
नेमबाजी – ५० मी रायफल थ्री पोझिशन पुरुषांची फायनल, ५० मी रायफल थ्री पोझिशन महिला पात्रता फेरी
टेबल टेनिस – पुरुष आणि महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी
टेनिस – पुरुष एकेरी उपांत्यपूर्व फेरी
२ ऑगस्ट, शुक्रवार
तिरंदाजी – मिश्र सांघिक उप उपांत्यपूर्व फेरी ते फायनल
ऍथलेटिक्स – पुरुष गोळाफेक पात्रता फेरी

बॅडमिंटन – महिला व पुरुष दुहेरी उपांत्य फेरी, पुरुष एकेरी उपांत्यपूर्व फेरी
हॉकी – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( दुपारी ४:४५)
गोल्फ – पुरुष दुसरी फेरी
रोईंग – पुरुष एकल स्कल्स फायनल्स
नेमबाजी – स्कीट पुरुष पात्रता, २५ मीटर पिस्तुल महिला पात्रता, ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स महिला अंतिम फेरी
टेबल टेनिस – पुरुष आणि महिला एकेरी उपांत्य फेरी
टेनिस – पुरुष एकेरी उपांत्य फेरी, पुरुष दुहेरी पदक सामने

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *