स्पेनचा ‘सूर्या’ ठरला ओल्मो; शेवटच्या क्षणी जिंकून दिली ट्रॉफी
Euro Final: युरो फायनलमध्ये टी-20 वर्ल्ड कपसारखा थरार! स्पेनचा ‘सूर्या’ ठरला ओल्मो; शेवटच्या क्षणी जिंकून दिली ट्रॉफी
टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये सूर्यकुमार यादवचा तो कॅच कोण विसरू शकणार नाही. या कॅचमुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी सनसनाटी विजय मिळवला आणि 11 वर्षांपासून सुरू असलेला ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.
आता तसेच काहीसे युरो 2024 च्या फायनलमध्ये घडले, सामन्याच्या शेवटच्या मिनिटांत स्पेनच्या डॅनी ओल्मोने एक शामदार गोल करत आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. युरो 2024 च्या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून चौथ्यांदा विजेतेपद पटकावले.
युरो कप फायनलमध्ये इंग्लंड आणि स्पेन यांच्यात सामना झाला. 86व्या मिनिटाला मिकेल ओयारजाबलच्या शामदार गोलच्या जोरावर स्पेनचा संघ 2-1 असा पुढे गेला. यानंतर सामन्यात इंग्लंड खुपच आक्रमण दिसत होता.
इंग्लंडच्या डेक्लान राइसने 90व्या मिनिटाला कॉर्नरवर हेडर मारला. जो स्पॅनिश गोलकीपर उनाई सायमनच्या वाइड झाला. एक सेंकद इंग्लंडला गोल झाला असे वाटले, पण लाइनवर उभ्या असलेल्या डॅनी ओल्मोने परत हेडर मारून बॉल गोल पोस्टच्या आत जाण्यापासून वाचवला. आणि शेवटच्या क्षणी जिंकून स्पेनला ट्रॉफी दिली.
इंग्लंड संघ शेवटच्या मिनिटांत पुनरागमन करण्यासाठी ओळखला जातो. इंग्लंडने प्री-क्वार्टर फायनलमध्ये स्लोव्हाकिया, उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंड आणि उपांत्य फेरीत नेदरलँड्सवर शेवटच्या मिनिटांत पुनरागमन करत विजय मिळवला होता. पण ओल्मोने अंतिम फेरीत हे होऊ दिले नाही.