Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनमध्ये सहभागी होणार ‘ही’ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ?

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनमध्ये सहभागी होणार ‘ही’ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ?

कलर्स मराठीवरील’बिग बॉस मराठी सीजन ५’ चं बिगुल वाजलं आहे. या वर्षी अभिनेता रितेश देशमुख या सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहे. २८ जुलैपासून सुरु होणाऱ्या या शोसाठी प्रेक्षक उत्सुक असून या सीजनला कोण सेलिब्रिटीज या कार्यक्रमात सहभागी होणार याची उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे. त्यातच आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

सध्या कलाकारांच्या बरोबरीनेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचं प्रस्थही वाढलंय. यांचाही चाहतावर्ग मोठा असून अनेक कार्यक्रमांमध्येही हे सहभागी झाल्याचं दिसून येतात. अशीच एक प्रसिद्ध मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘बिग बॉस मराठी सीजन ५’ मध्ये सहभागी होणार असल्याची बातमी समोर येतेय.
बिग बॉस मराठी_५ असं नाव असलेल्या एका इंस्टाग्राम पेजने शेअर केलेल्या लेटेस्ट अपडेटनुसार सोशल मीडियावर कोकणहार्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेली अंकिता प्रभू वालावलकर बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार आहे. २८ जुलैला अंकिता बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. पण याबाबतची निश्चित माहिती शो सुरु झाल्यावरच समजेल. कोकणहार्टेड गर्ल नावाने फेमस असलेली अंकिता प्रभू वालावलकर ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बरीच चर्चेत असते. अनेक राजकीय घटनांवर तिने भाष्य केलं असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ती सपोर्ट करते. मध्यंतरी ती ओंकार भोजनेला डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण तसं काहीही नसल्याचं तिने नंतर स्पष्ट केलं. कोकणात तिच्या वडिलांच्या मालकीचं रिसॉर्ट असून या रिसॉर्टवर अनेक सेलिब्रिटीजही राहायला जातात.
मध्यंतरी तिने तिच्या एका जुन्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला होता. यामुळेही ती चर्चेत आली होती. आई-बाबांना सोडून ती त्या काळात त्या मुलाबरोबर लिव्ह इन मध्ये राहत असल्याचं भाष्य तिने केलं होतं.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *