इंडियन बँकेत १५०० जागांसाठी भरती सुरू; आजच करा अर्ज

इंडियन बँकेत १५०० जागांसाठी भरती सुरू; आजच करा अर्ज

Indian Bank Recruitment 2024: इंडियन बँकेने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे…

इंडियन बँकेने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती १५०० रिक्त जागांसाठी होणार आहे, तर इच्छुक व पात्र उमेदवार इंडियन बँकेच्या (Indian Bank ) अधिकृत वेबसाइटद्वारे indianbank.in ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जप्रक्रिया १० जुलै २०२४ पासून सुरू झाली असून ३१ जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, उमेदवारांची निवड कशी होणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

Indian Bank Recruitment 2024: शैक्षणिक पात्रता

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ३१/३/२०२० नंतर पदवी पूर्ण केलेली असावी आणि त्यांच्याकडे उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र असावे.

Indian Bank Recruitment 2024: वयोमर्यादा

उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावी. तसेच एससी / एसटी / ओबीसी / पीडब्ल्यूबीडी इत्यादी श्रेणींसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

Indian Bank Recruitment 2024: अर्ज फी

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. तर एससी / एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. तसेच उमेदवाराने अर्ज फी ऑनलाइन भरावी.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *