‘किंग’ कोहलीचा पॅरिस ऑलिम्पिकसाठी खास मेसेज
Paris Olympic 2024: विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करून पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना खास संदेश दिला आहे. पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकला 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे. आणि क्रीडाच्या या महाकुंभासाठी प्रत्येकजण उत्सुक दिसत आहे. दरम्यान विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करून पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना खास संदेश दिला आहे.
किंग कोहली व्हिडिओमध्ये म्हणाला, इंडिया… भारत… हिंदुस्तान…. एक काळ असा होता जेव्हा भारत हा केवळ साप आणि हत्तींचा देश म्हणून जगभर ओळखला जायचा. पण आता काळानुसार हे बदलत गेले आहे. आज आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून ओळखले जात आहोत. क्रिकेट, बॉलीवूड, स्टार्टअप युनिकॉर्न आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था यासाठी ओळखले जाते.
किंग कोहली पुढे म्हणाला, “आता या महान देशासाठी कोणती मोठी गोष्ट असले ती म्हणजे अधिक सुवर्णपदक, रौप्यपदक आणि कांस्यपदक. आमचे भाऊ आणि बहिणी पॅरिसला गेले आहेत आणि पदकांसाठी भुकेले आहेत. आपले ॲथलीट ट्रॅक आणि फील्ड आणि कोर्ट आणि रिंगवर पाऊल ठेवताना अब्जावधी लोक त्यांना पाहत असतील. त्यावेळी ‘इंडिया, इंडिया, इंडिया’चे नारे भारताच्या प्रत्येक भागात आणि कोपऱ्यात ऐकू येतील. अभिमानाने तिरंगा फडकवण्याच्या निर्धाराने व्यासपीठावर येताना त्यांचे चेहरे आठवा. शेवटी कोहलीने शुभेच्छा दिल्या.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झेंडा फडकवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज दिसत आहेत. यापूर्वी 2020 मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने 7 पदके जिंकली होती, त्यापैकी एक सुवर्णपदक होते. याशिवाय 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश होता. कोणत्याही ऑलिम्पिकमध्ये भारताची ही सर्वाधिक पदके होती. याआधी भारताच्या खात्यात सर्वाधिक 6 पदके 2012 मध्ये लंडनमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये आली होती.