सोने होणार स्वस्त!

सोने होणार स्वस्त!

One Nation One Rate: सोने होणार स्वस्त! देशभरात असणार एकच भाव, काय आहे ‘वन नेशन वन गोल्ड रेट’ धोरण?

One Nation One Gold Rate Explainer: सध्या देशभरात सोन्याचे भाव वेगवेगळे आहेत. राज्य सरकारच्या कराशिवाय इतरही अनेक गोष्टी यात गुंतलेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक राज्यात आणि शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.
सध्या देशभरात सोन्याचे भाव वेगवेगळे आहेत. राज्य सरकारच्या कराशिवाय इतरही अनेक गोष्टी यात गुंतलेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक राज्यात आणि शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. मात्र, लवकरच संपूर्ण देशात वन नेशन वन रेट धोरण लागू होणार असून, त्यानंतर सोन्याचा भाव सर्वत्र सारखाच असेल. देशभरातील सर्व बड्या ज्वेलर्सनी याला सहमती दर्शवली आहे.

वन नेशन वन गोल्ड रेट पॉलिसी म्हणजे काय?

केंद्र सरकारने प्रस्तावित केलेली ही योजना आहे, ज्याचा उद्देश देशभरात सोन्याच्या किमती एकसमान असणे हा आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात सोने खरेदी केले, मग ते पुणे असो किंवा जळगाव, त्याची किंमत सारखीच असेल.

या धोरणांतर्गत, सरकार नॅशनल बुलियन एक्स्चेंज तयार करेल, जे सर्वत्र सोन्याच्या समान किमती निश्चित करेल आणि ज्वेलर्स समान किंमतीला सोने विकतील.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *