कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज 2024
Kusum solar pump yojana maharashtra 2024 online apply केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार \’महाकृषी ऊर्जा अभियान\’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.
या अभियांनातर्गत पुढील 5 वर्षात 5 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास व त्यापैकी पहिल्या वर्षासाठी मंजूर १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी.
सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे On-line अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. kusum solar pump yojana maharashtra 2024-2025 खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
महाऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषिपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची प्रधानमंत्री कुसुम योजना
योजनेचे नाव | महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन व केंद्र शासन |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
उद्दिष्ट | शेतकऱ्यांना सोलर पंप पुरवणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
वेबसाईट | kusum.mahaurja.com/solar |
कुसुम सोलर पंप योजनेची वैशिष्टये
- पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्हयात आस्थापना शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार. (www.mahaurja.com registration)
- शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP. 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप mahaurja solar pump उपलब्ध होणार.
- सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा.
- स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय
कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी निवडीचे ठळक निकष 2024
- शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
- पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी. www.mahaurja.com kusum registration
- अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार.
- 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DC वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय
PM Kusum Yojana Documents 2024
- 7/12 उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
- आधारकार्ड प्रत – Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2024 Online Apply, mahaurja
- रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.
- पोर्ट आकाराचा छायाचित्र.
- शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.
कुसुम सोलर पंप योजना अनुदान किती?
Kusum Saur Krushi Pump Yojana Scheme Subsidy
पुढील माहिती याप्रमाणे दिलेली आहे:
प्रवर्ग – मूळ किंमत – जी.एस.टी (8.9%) – एकूण – सुधारित जी.एस.टी. (13.8%) – एकूण – शेतकऱ्याने जमा करावयाचा अतिरिक्त लाभार्थी हिस्सा (रु.)
शेतकऱ्याला फक्त खाली दिलेली रक्कम भरावयाची आहे, शेतकर्यांना अन्य कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही.
3 एच.पी.
- खुला – 19,380/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 9,690/-
5 एच पी
- खुला – 26,975/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 13,488/-
7.5 एच.पी.
- खुला -37,440/-
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 18,720/-
अशाप्रकारे कुसुम सोलर पंप योजनेचे नवीन दर जाहीर झाले.