ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल

आठवड्याभरात दुसऱ्यांदा प्रकृती खालावली.भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्री नऊ वाजता दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वाढत्या वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. रुग्णालयात ते सध्या डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. रात्री ११ च्या दरम्यान रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्यांना गुरुवारीदेखील रुग्णालयात थांबून उपचार घ्यावे लागणार आहेत. अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे गेल्या आठवड्यातही (२७ जून) त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) त्यांच्यावर उपचार करण्यात आले. चार दिवस उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं. अडवाणी हे सध्या ९६ वर्षांचे आहेत. वाढत्या वयामुळे त्यांना तब्येतीच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने चार महिन्यापूर्वी भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं. प्रकृतीच्या कारणास्तव ते राजभवनावर आयोजित कार्यक्रमाला जाऊ शकले नव्हते. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला होता. यावेळी त्यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लालकृष्ण अडवाणी यांचे कुटुंबिय उपस्थित होते. याआधी २०१५ मध्ये त्यांना देशातील दुसरा सर्वात मोठा नगरी सन्मान पद्म विभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *