ठाकरे मविआ सोडणार?
पवारांचे अनेक कॉल, पण नो रिस्पॉन्स; MLC निवडणुकीआधी घमासान
Election 2024: विधान परिषद निवडणुकीपूर्वी झालेल्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, उमेदवार जयंत पाटील, ठाकरेसेनेचे नेते अनिल देसाई यांच्यात बैठक झाली. या बैठकीला शेकापच्या जयंत पाटील यांचे पुतणे निनाद पाटीलदेखील उपस्थित होते. काका जयंत पाटील यांच्याविरोधात ठाकरेसेना कट रचत असल्याचा आरोप निनाद पाटील यांनी केला. त्यामुळे मतदानापूर्वी महाविकास आघाडीत संघर्ष पेटला. ‘मुंबई तक’नं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.विधान परिषद निवडणुकीत मविआचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर आघाडीतील मतभेद समोर येऊ लागले आहेत. ठाकरेंनी मविआ सोडण्याची धमकी दिली होती, अशी
मुंबई: विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं त्यांचे सगळेच्या सगळे ९ उमेदवार निवडून आणले. तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार जिंकले, तर शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. यानंतर आता महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. निवडणुकीआधी घडलेल्या घडामोडी आता पुढे येऊ लागल्या आहेत. आपला उमेदवार पराभूत झाल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी आघाडीतील अन्य घटक पक्षांना दिला होता.