नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प….अर्थसंकल्पात होऊ शकतात मोठ्या घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून कर्मचारी वर्गासह सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. पाहूया काय म्हणताहेत तज्ज्ञ.
Budget 2024: ₹१ लाखांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन, होम लोनवर अधिक सूट; अर्थसंकल्पात होऊ शकतात मोठ्या घोषणा
Budget 2024-25: अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नव्या पहिला अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून कर्मचारी वर्गासह सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, २०२४-२५ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात स्टँडर्ड डिडक्शन (Standard Deduction) दुप्पट करून एक लाख केलं जाऊ शकते, अशी आशा सल्लागार कंपनी केपीएमजीनं व्यक्त केलीये. याशिवाय गृहकर्जावरील व्याजावरील करसवलतीतही वाढ होण्याची शक्यता असून गॅपिटल गेन टॅक्सही तर्कसंगत केला जाण्याची अपेक्षा वर्तवण्यात आलीये. ‘वैद्यकीय खर्च, इंधन खर्च आणि महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वैयक्तिक खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यानुसार स्टँडर्ड डिडक्शन सध्याच्या ५० हजार रुपयांवरून एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे,’ असं केपीएमजीनं एका नोटमध्ये म्हटलंय.
सरकारनं ग्राहकांच्या हातात अधिकाधिक पैसा ठेवण्यासाठी
प्रयत्न करावेत, असं सल्लागार कंपनीनं म्हटलंय. नव्या कर प्रणालीअंतर्गत सरकार करसवलतीची मर्यादा तीन लाखरुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.