पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवनातील जलसाठ्यात 3.94 टक्क्यांची वाढ!
Pavana Dam Update:धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवडकरांना आणि मावळातील शेतकऱ्यांची तहान भागवणाऱ्या पवना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहे.पुणे शहर परिसरामध्ये दोन दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहर परिसरातील धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहेत. पिंपरी चिंचवडकरांना आणि मावळातील हजारो शेतकऱ्यांची तहान भागवणाऱ्या पवना धरणाच्या(Pavana Dam) पाणी साठ्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत असून ही आनंदाची बातमी नागरिकांसाठी आहे.
परिसरात काल(शनिवारी) पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे एका दिवसांत पाणी पातळीमध्ये 3.94 इतकी वाढ झाली आहे. आज (रविवारी) सकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा 28.77 टक्के इतका झाला आहे. पवना धरण परिसरात काल दिवसभरात 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पावसाळा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 662 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सध्या धरणात 28.77 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत 655 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यावेळी धरणातील पाण्याची पातळी 30.75 टक्के इतकी होती. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पवना धरणात(Pavana Dam) 17.43 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामध्ये आत्तापर्यंत 11.34 टक्के इतका पाणीसाठा वाढला आहे. मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आता मान्सून चांगलाच सक्रीय झाला आहे.