प्रधानमंत्री आवास योजना -दारिद्रय रेषेखालील कुटूंबांना थेट कर्ज योजना

प्रधानमंत्री आवास योजना -दारिद्रय रेषेखालील कुटूंबांना थेट कर्ज योजना

   प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण

  • प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते.
  • ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.
  • लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते.
  • योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी आहेत.
  • वरील अटींची पुर्तता करणाऱ्या व कायम प्रतिक्षा यादीत समाविष्ट न झालेल्या कुटूंबांनी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
  • सन 2002 मध्ये झालेल्या दारिद्रय रेषेच्या सर्व्हेनुसार सन 2007-08 ते सन 2014-15 मध्ये लाभार्थ्यांची निवड करून घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे.
  • सन 2011 च्या आर्थिक सामाजिक व जात सर्वेक्षणाची माहितीच्या आधारे सन 2015-16 पासून पुढील वर्षांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
  • लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रू.95,000/- इतके अर्थसहाय दिले जाते.
  • घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.
  • स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण
  • सन 2016-17 पासून प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जाणार आहे.
  • घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रू.1.20 लक्ष व नक्षलग्रस्त भागाकरिता रू.1.30 लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येणार आहे.
  • प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेचे अर्थसहाय राज्यस्तरावरील बँक खात्यातून PFMS प्रणालीव्दारे लाभार्थ्यांच्या बँक/पोस्ट खात्यात जमा होणार आहे.
  • प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, 2011 मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडीकरिता वापरण्यात येणार आहे.
  • प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक सहाय्य पुरविण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सहाय्य संस्था गठीत करण्यात येणार आहे.
  • घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मुजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.
  • स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.
  • प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण व अन्य ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण गठीत करण्यात आला आहे.
  • कक्षाचे कार्यालय सिडको भवन, 5 वा मजला, सी.बी.डी.बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यरत आहे. श्री. संतोष कवडे, संचालक
    व श्रीमती मंजिरी टकले, उप संचालक

    यांचेमार्फत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी केली जाते.

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *