महामंडळाची स्थापना व उद्दिष्टे

महामंडळाची स्थापना व उद्दिष्टे

स्थापना : महाराष्ट्र शासन, शासन निर्णय, समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग क्र. इमाव १०९६/प्र . क्र . ३९५ / विघयो – २, दिनांक २५ सप्टेंबर १९९८ अन्वये २३ एप्रिल १९९९ रोजी ( कंपनी अधिनियम १९५६ ) महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

 

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाची स्थापना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. कुविम २००६ / प्र. क्र. २८९ / विघयो – २, दिनांक २५ ऑगस्ट २००९ अन्वये १८/०६/२०१० रोजी ( कंपनी अधिनियम १९५६ ) कोकण विभागा करिता महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे. या महामंडळाचे कार्यक्षेत्र कोकण विभागातील ७ जिल्हे असे आहे.

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि.09 ऑगस्ट, 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.04.12.2023 रोजी (कंपनी अधिनियम 2013) वीरशैव – लिंगायत समाजाकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे. या महामंडळाचे कार्यक्षेत्र सर्व 36 जिल्हे असे आहे.

संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि.09 ऑगस्ट, 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.04.12.2023 रोजी (कंपनी अधिनियम 2013) गुरव समाजाकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे. या महामंडळाचे कार्यक्षेत्र सर्व 36 जिल्हे असे आहे.

ओबीसी प्रवर्गातील बेरोजगारांना आधुनिक आणि पारंपारिक अशा दोन्ही व्यवसायांसाठी कमी व्याजदराने वित्त पुरवठा करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असले तरी स्वयंरोजगाराला चालना देताना ओ. बी. सी. प्रवर्गातील व्यक्तींनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे , त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी इतर योजना राबविणे हि पण उद्दिष्टे आहेत.

 

१.
राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी कृषी विकास, पणन, संस्करण, कृषी उत्पादनाचा पुरवठा आणि साठवण, लघु उद्योग, इमारत बांधणी, परिवहन या कार्यक्रमाची आणि अन्य व्यवसाय ( वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्रीय या सारखे ) व्यापार किंवा उद्योग याची योजना आखणे, त्यांना चालना देणे, सहाय्य करणे, सल्ला देणे, मदत करणे, वित्त पुरवठा करणे, त्यांचे संरक्षण करणे.

२.
इतर मागासवर्गीयांची आर्थिक स्थिती, उत्पादन निर्मिती, व्यवस्थापन आणि पणन यांचा विकास करणे / त्यात सुधारणा करणे, त्यांचे कामकाज, व्यवसाय, व्यापार किंवा उद्योग सुरु करण्यासाठी त्यांना भांडवल, पतसाधने, साधन सामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.

३.
इतर मागासवर्गीयांसाठी कृषी उत्पादने, वस्तू, साहित्य आणि सामुग्री यांची बनावट, निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती किंवा संघटनांबरोबर काम करणे आणि त्यांच्या कडील मागण्या हाती घेणे आणि त्या इतर मागासवर्गीय लोकांना उपकंत्राटाने देऊन किंवा त्याबाबत त्यांच्याकडे कामाच्या मागण्या सुपूर्द करून, त्यांचे कडून कामे यथायोग्यरीतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.

४.
राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे, या प्रयोजनासाठी अहवाल आणि निलप्रती (ब्लू प्रिंट्स) तयार करणे, तयार करून घेणे, आणि आकडेवारी व इतर माहिती गोळा करणे.

 

          सेवा उद्योग                                                                        लघु उद्योग                                                                     कृषीसंलग्न व्यवसाय

 

पारंपारिक उद्योग                                                                    वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय

 

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *