महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग,
नवीन प्रशासकीय इमारत, खोली क्र.307,
तिसरा मजला, विधान भवनासमोर,
पुणे-411001.
दूरध्वनी क्रमांक- 020-26053056
ई-मेल – msbccpune[at]gmail[dot]com
राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागासप्रवर्गात एखादी जात समाविष्ट करण्यासाठी किंवा त्या प्रवर्गातून एखादी जात वगळण्याबाबत आलेल्या मागण्या व तक्रारींची तपासणी करून अभ्यासपूर्ण शिफारस राज्य शासनास करण्याकरिता राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली असून आयोगाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम २००५.(मराठी) (6.2 MB)
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम, 2005 मधील कलम 3 अन्वये गठीत आयोग
समर्पित आयोग
आयोगाची रचना:- हा आयोग, राज्य शासनाने नामनिर्देशित केलेल्या खालील सदस्यांचा मिळून बनलेला असेल :-
- जी, सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे किंवा होती, अशी अध्यक्षपदस्थ व्यक्ती.
अनुभवाधिष्ठित संशोधनाचा अनुभव असलेले समाजशास्त्रज्ञ . - राज्याच्या सहा महसुल विभागांपैकी प्रत्येक विभागामधून घेतलेला प्रत्येकी एक याप्रमाणे इतर मागासवर्गाशी संबंधित बाबीचे ज्ञान असलेले सहा सदस्य; परंतु, या सदस्यांपैकी एकापेक्षा कमी नसतील, इतके महिला सदस्य असतील आणि इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती यातील प्रत्येकी एक सदस्य असेल,
- सामाजिक न्याय विभागातील सह संचालक या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला व जो राज्य शासनाचा अधिकारी आहे किंवा होता, असा सदस्य सचिव.
आयोगाची कामे :-
1. नागरिकांच्या कोणत्याही वर्गाचा मागासवर्ग म्हणून सूच्यांमध्ये अंतर्भाव करण्याची विनंती विचारार्थ स्विकारणे आणि तपासणे.
2. नागरिकांच्या कोणत्याही वर्गाचा, अशा सूच्यांमध्ये कमी किंवा जास्त प्रमाणात अंतर्भाव झाल्याविषयीच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे, त्यांची सुनावणी करणे, त्यांची चौकशी करणे आणि तपासणे व त्यास योग्य वाटेल असा सल्ला राज्य शासनाला देणे.
3. नागरिकांचा मागासवर्ग निश्चित करण्याचे निकष आणि पध्दती यासंबंधी नियतकालीक आढावा घेवून, त्याबाबत राज्य शासनाकडे शिफारशी करणे.
4. नागरिकांच्या विविध वर्गाच्या बदलत्या सामाजिक-आर्थिक दर्जाविषयीची आधार- सामुग्री तयार करण्यासाठी नामांकित शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमार्फत आणि त्यांच्या सहकार्याने नियमित तत्वावर चालविले जाणारे अभ्यास आयोजित करवून घेणे.
5. नागरिकांच्या मागासवर्गाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीचा नियमितपणे आढावा घेणे, आणि
6. विहित करण्यात येतील अशी इतर कामे पार पाडणे.
समर्पित आयोगाची कार्यकक्षा :-
- विनिर्दिष्ट कामे पार पाडण्यासाठी समर्पित आयोग म्हणून घोषित केलेल्या महाराष्ट्र राज्य आयोगाच्या कार्यकक्षेत इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन अधिसूचना, दिनांक 27.12.2021 अन्वये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली. (1.48 MB).
- महाराष्ट्र राज्यातील स्थानिक संस्थांच्या हद्दीतील समकालीन अनुभवजन्य मागासलेपणाचे स्वरुप आणि परिणाम यांची काटेकोरपणे तपासणी करणे.
- राज्य शासनाकडून या संदर्भात निर्देशित करण्यात येणाऱ्या इतर प्रकरणांची तपासणी करणे.
- राज्य शासनाने विनंती केल्यास, अंतरिम अहवाल सादर करणे आणि समकालीन अनुभवजन्य काटेकोर तपासणीच्या आधारे वस्तुस्थिती व निरीक्षणे नोंदवून स्थानिक संस्थानिहाय शिफारस करुन अंतिम अहवाल तीन महिन्यांच्या कालावधीत राज्य शासनास सादर करणे.