महिलांसाठी केंद्र सरकारच्या या योजना माहीत आहेत का? घरबसल्या घेऊ शकता लाभ
Best Govt Schemes For Women: गेल्या काही वर्षांत, भारत सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत विशेषतः महिलांसाठी आणि त्यांना त्यांचे योग्य सामाजिक सन्मान प्रदान करणे आणि कमाईचे मार्ग
- महिलांच्या सशक्ती करणासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे आज अनेक योजना राबवल्या जात आहेत.
- महिला या योजनांचा लाभ घर बसल्या देखील घेऊ शकतात
- देशात अजूनही आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल अशा महिलांची संख्या मोठी आहे
आज भारत विकसनशील अर्थव्यवस्थेकडून चमकदार अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. देशाच्या या प्रगतीमागे महिलांचे मोठे योगदान आहे. एक काळ असा होता की महिलांसाठी घराबाहेर पडणेही फार कठीण होते पण आता काळ बदलला आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात चुरशीची स्पर्धा करत आहेत. व्यवसाय, शिक्षण, मनोरंजनापासून ते आयटी आदी अनेक क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत.
दुसरीकडे, देशात अजूनही अशा महिलांची संख्या मोठी आहे ज्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आहेत. अशा परिस्थितीत या महिलांना पुढे नेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांचा उद्देश देशातील महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. आज आपण अशाच काही योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.
देशातील मोठ्या लोकसंख्येमध्ये गरीब आणि नोकरदार महिलांचा समावेश आहे. या महिलांना रोजच्या गरजचा पुरवण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. महिलांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने गरीब आणि कष्टकरी महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार देशातील प्रत्येक राज्यात ५० हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन देते जेणेकरून त्यांना स्वत:चा रोजगार सुरू करता येणार येईल.
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; गुंतवणुकीविषयक आता चोवीस तास तक्रार करता येणार
सुकन्या समृद्धी योजना
ही एक छोटी बचत योजना असून मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्या मुलीचे वय १० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी तिचे खाते उघडावे लागेल. या योजनेत तुम्ही किमान २५० रुपये गुंतवू शकता. तसेच आपण या योजनेत जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकता.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना
भारत सरकारने २०१५ मध्ये ही योजना सुरू केली होती. देशातील मुलींच्या लिंग गुणोत्तरातील घट थांबवणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांनाही मदत करत आहे.
महिला शक्ती केंद्र योजना
या योजनेचा उद्देश महिलांना सक्षम करणे हा आहे. ही योजना २०१७ मध्ये सुरू करण्यात आली असून या योजनेंतर्गत देशभरात सामाजिक सहभागातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचे काम केले जात आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजना
देशात अजूनही शा महिलांची संख्या मोठी आहे ज्यांच्याकडे अद्यापही एलपीजी गॅस सिलिंडर नाही. या महिला आजही स्वयंपाकासाठी लाकूड, शेण किंवा इतर साधनांचा वापर करतात. अशा स्थितीत महिलांना स्वयंपाक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही त्यांना उद्भवतात. महिलांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे.