मुंबई विद्यापीठात १५२ पदांवर भरती,कसा करायचा अर्ज?
Mumbai University Recruitment 2024: मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) प्राध्यापक पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट muappointment.mu.ac.in वर ऑनलाइन अर्ज पाठवू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील १५२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत ; ज्यामध्ये विद्याशाखेच्या अधिष्ठाता पद, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक / सहाय्यक ग्रंथपाल आदी पदांचा समावेश आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे. तर या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, अर्ज कसा करायचा, कुठे पाठवायचा, अर्ज फी याबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊ.
Mumbai University Recruitment 2024: रिक्त पदे व पदसंख्या
विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदांसाठी – ४ जागा.
प्राध्यापक : २१ पदे.
सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल : ५४ पदे
सहाय्यक प्राध्यापक / सहाय्यक ग्रंथपाल : ७३ पदे
Mumbai University Recruitment 2024: अर्ज कुठे पाठवायचा?
उमेदवारांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जाचे तीन संच रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ, खोली क्रमांक २५, फोर्ट, मुंबई-४००३२ येथे पाठवायचे आहेत. उमेदवाराने अर्जाच्या सर्व संचासह त्याचा/तिचा बायोडेटा सबमिट करावा.