मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणारी ‘लेक मुलगी योजना’
लेक मुलगी योजना: 10 मार्च 2023 रोजी, महाराष्ट्र सरकारने आपला वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी गरीब घरातील मुलींसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव त्यांनी “लेक लाडकी योजना”ठेवले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
लेक लाडकी योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना ही सुविधा मिळणार आहे. या योजनेनुसार, घरात मुलीच्या जन्मासाठी ५०० रुपये, इयत्ता चौथीला ४००० रुपये, इयत्ता सहावीला ६००० रुपये आणि इयत्ता अकरावीला ८००० रुपये अभ्यासासाठी दिले जातील. लाभार्थी मुलीला पुढील शिक्षणासाठी 75 हजार रुपये दिले जातील, ज्याचा वापर करून ती तिचा अभ्यास पूर्ण करू शकेल.