मेहनतीच्या जोरावर उभारली ६५ हजार कोटींची कंपनी; पण नव्या संधीसाठी दिला राजीनामा; जाणून घ्या राहुल जैमिनी यांचा प्रेरणादायी प्रवास

मेहनतीच्या जोरावर उभारली ६५ हजार कोटींची कंपनी; पण नव्या संधीसाठी दिला राजीनामा; जाणून घ्या राहुल जैमिनी यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story:अनेक आयआयटी पदवीधर सध्या जगातील विविध मोठ्या कंपन्यांचे नेतृत्व करीत आहेत. बऱ्याचदा आयआयटी पदवीधर त्यांच्या पदवीनंतर चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवतात. तसेच सध्या जगभरात अनेक आयआयटी पदवीधरांनी सुरू केलेल्या नवीन कंपन्या आहेत. या कंपन्या उभारण्यासाठी ते दिवस-रात्र मेहनतदेखील घेतात. राहुल जैमिनी हे असेच एक आयआयटी पदवीधर आहेत; ज्यांनी आपले कौशल्य वापरून ६५ हजार कोटींची कंपनी उभारली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी मोठी कंपनी स्थापन केल्यानंतर त्यांच्या नवनवीन समस्या सोडविण्याच्या क्षमतेला पुढे नेण्यासाठी ते व्यवसाय सोडून वेगळ्या मार्गावर गेले. राहुल जैमिनी हे स्विगीचे सह-संस्थापक आहेत; ज्याची किंमत आता ६५ हजार कोटी इतकी आहे.

प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगत असते. जगात प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे असते. कोणाला पोलिस व्हायचे असते, तर कोणाला व्यावसायिक व्हायचे असते. स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करीत असतात. पण, या प्रयत्नांना अनेकदा हवे तसे यश मिळत नाही. त्यामुळे काही जण खचून जातात आणि ते स्वप्नपूर्तीसाठी चालत असलेली वाट अर्धवट सोडून देतात; तर काही जण थोड्या मिळालेल्या यशातही समाधानी होतात. पण, असेदेखील काही लोक असतात, जे कितीही पैसा कमावला, कितीही यश मिळाले तरी थांबत नाहीत. ते त्यांची प्रगती आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रेरणादायी व्यावसायिकाची कथा सांगणार आहोत.

 

असा सुरू झाला प्रवास

राहुल जैमिनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूरचे माजी विद्यार्थी आहेत. पदवी शिक्षणादरम्यान ते व्हर्जिनिया टेक आणि फिलिप्स रिसर्चमध्ये इंटर्न करीत होते. आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर त्यांना Myntra येथे नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांनी आणखी दोन कंपन्यांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांना व्यवसायासाठी मदतीला लागणारे विश्वासू भागीदार मिळाले. २०१४ मध्ये स्विगी सुरू करण्यासाठी त्यांनी श्रीहर्ष मॅजेटी आणि नंदन रेड्डी यांच्याशी भागीदारी केली. या प्लॅटफॉर्मची सुरुवात बेंगळुरूमध्ये एक लहान स्टार्टअप म्हणून झाली होती; पण आता ती भारतातील लोकप्रिय व प्रसिद्ध खाद्य वितरण सेवांपैकी एक बनली. स्विगीची तांत्रिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात राहुल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

 

राहुल यांनी अनेक नावीन्यपूर्ण वैशिष्ट्ये जोडून स्विगीला संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय केले आणि घरपोच सेवा वाढवण्यात मदत केली. स्विगीसाठी जवळपास सहा वर्षे काम केल्यानंतर राहुल यांनी पेस्टो टेक या करिअरच्या गतीवर फोकस केलेल्या स्टार्टअपमध्ये सामील होण्यासाठी CTO पदाचा राजीनामा दिला. त्यांचा प्रवास अनेक महत्त्वाकांक्षी उद्योजकांसाठी आणि तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *