शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या ५ महत्वपूर्ण योजना; फायदे ते पात्रतेपर्यंत सर्वकाही जाणून घ्या…
5 Government Schemes for Farmers: देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य आणि केंद्र सरकार आपापल्यापरीने अनेक योजना राबवत आहे. देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. आज सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी महत्वपूर्ण सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक व इतर फायदे दिले जातात.
- शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारने मोठी पावले उचलली आहेत
- आज देशभरात शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना सुरु आहेत
- केंद्र सरकारच्या या योजनांचा लाभ लाखो अन्नदात्यांना मिळत आहे
आपल्या देशात जवळजवळ प्रत्येक विभागासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत, ज्याचा उद्देश गरजू आणि गरीब घटकांना मदत करण्याचा आहे. यामध्ये आरोग्य, रोजगार, विमा, रेशन अशा अनेक योजनांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबवल्या जात आहेत. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक व इतर फायदे दिले जातात. त्याचबरोबर सध्या या योजनांचा लाभही मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहेत. आज देशभरात शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या अशा पाच योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.
पीएम किसान सन्मान निधी योजना
केंद्र सरकारद्वारे ही योजना राबवली जात असून आज देशभरातील शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात, जे प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हफ्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
पीएम किसान मानधन योजना
ही योजना देखल केंद्र सरकारद्वारे चालवली जाते, ज्यामध्ये वयाच्या ६० वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळते. याआधी तुम्हाला तुमच्या वयानुसार प्रीमियम भरावा लागेल. १८ ते ४० वर्षे वयोगटातील यामध्ये अर्ज करू शकता, जर तुमचे वय १८ वर्ष असेल तर तुम्हाला दरमहा ५५ रुपये प्रीमियम भरावा लागेल.
प्रधानमंत्री कुसुम योजना
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरपंप बसवण्यासाठी ६० टक्के अनुदान आणि ३० टक्के कर्ज देत आहे. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सौर पंप किंवा कूपनलिका बसवू शकतात.
कूपनलिका योजना
उत्तर प्रदेशात या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो, कारण ती राज्य सरकारद्वारे राबवली जात आहे. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात कूपनलिका बसवू शकतात. तुम्ही यासाठी UPPCL च्या अधिकृत वेबसाइट https://www.upenergy.in/ वर जाऊन अर्ज करू शकता.
रयथू बंधू योजना
तेलंगणा सरकारने ही एकमेव योजना आपल्य राज्यतील शेतकऱ्यांसाठी सुरु केली आहे. योजनेंतर्गत, राज्य सरकारकडून प्रतिवर्षी १०,००० रुपयांची पात्र आर्थिक मदत मिळेल. जर तुमच्या नावे स्वतःची जमीन असेल तर तुम्हाला योजनेचा फायदा होऊ शकतो.