सचिन-रोहितसह तीन भारतीय संघात
भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने वर्ल्ड चॅम्पिनयशीप ऑफ लीजंड्स स्पर्धेचे इंडिया चॅम्पियन्स संघाकडून विजेतेपद जिंकले आहे. या स्पर्धेदरम्यान, युवराज सिंगने त्याची सर्वकालिन सर्वोत्तम प्लेइंग-११ निवडली आहे.
त्याने त्याच्या या प्लेइंग-११ मध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा या तीन भारतीय खेळाडूंना स्थान दिले आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीलाही स्थान दिले नाही.
युवराजने सलामीसाठी सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग यांना निवडले आहे, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी रोहित शर्मा व विराट कोहली यांची निवड केली. पाचव्या क्रमांकावर युवराजने एबी डिव्हिलियर्सला स्थान दिले आहे. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून युवराजने ऍडम गिलख्रिस्टला निवडले आहे.युवराजने सातव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नला ठेवले आहे, त्यानंतर श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला स्थान दिले आहे. वेगवान गोलंदाजीसाठी त्याने ग्लेन मॅकग्रा आणि वासिम आक्रमला स्थान दिले आहे, तर इंग्लंडचा अष्टपैलू अँड्र्यु फ्लिंटॉफलाही त्याने या संघात निवडले आहे. याशिवाय युवराजने स्वत:ला १२ वा खेळाडू म्हणून निवडले आहे.