सर्वसामान्यांना मोठा धक्का!
घाऊक महागाई दर 16 महिन्यांच्या उच्चांकावर, काय आहे कारण?
WPI Inflation Data: वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. जून महिन्यातील घाऊक महागाई दराची आकडेवारी जाहीर झाली आहे. जून महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमतीमुळे घाऊक महागाईचा दर 16 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. जून महिन्यातील घाऊक महागाई दराची आकडेवारी जाहीर झाली आहे. जून महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमतीमुळे घाऊक महागाईचा दर 16 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. घाऊक महागाईचा दर गेल्या महिन्यात 3 टक्क्यांच्या पुढे गेला असून तो 3.36 टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी मे महिन्यात हा दर 2.61 टक्के होता.
अन्नधान्याच्या महागाई दरात वाढ…महागाई वाढण्याचे कारण काय?
जूनमध्ये महागाई दर वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे अन्नधान्य महागाई दर आणि प्राथमिक वस्तूंच्या महागाई दरात झालेली वाढ. उत्पादित उत्पादनांचा महागाई दर एक टक्क्यांपेक्षा कमी होता, तो यावेळी जवळपास दीड टक्क्यांवर पोहोचला असून, त्याचा परिणाम घाऊक महागाई दरावर झाला आहे. अन्नधान्य महागाई वाढीचा दर जूनमध्ये 8.68 टक्के झाला आहे, जो मेमध्ये 7.40 टक्के होता.
मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, जून 2024 मध्ये महागाई दर सकारात्मक राहिला. महागाई दर वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे किमती. उत्पादित अन्नपदार्थ, कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू, खनिज तेल आणि अनेक उत्पादित उत्पादनांच्या किमती वाढल्यामुळे महागाईचा दर वाढला आहे.